बांद्रे एमआयजी येथे अरुणोदय वॉकर्सच्या चालण्याच्या स्पर्धा उत्साहात संपन्न
मुंबई (प्रतिनिधी)-बांद्रे पूर्वेकडील अरुणोदय वॉकर्स असोसिएशनतर्फे वय वर्षे ४० ते १०० या वयोगटातील स्त्री-पुरुषांसाठी आयोजित करण्यात आलेल्या चालण्याच्या स्पर्धा रविवार, दि. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ६.३० ते ८.०० या वेळेत एमआयजी ग्राउंड, बांद्रे पूर्व येथे उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडल्या.या स्पर्धांमध्ये विविध वयोगटांतील ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
६० वर्षांवरील पुरुष गटात प्रथम एकनाथ पाटील, द्वितीय रंगराजन आणि तृतीय मा. दिया सांता यांनी बाजी मारली, तर महिला गटात प्रथम सरोज मुतालीम, द्वितीय तेरीसा भरबोजा आणि तृतीय जयश्री चौधरी यांनी यश संपादन केले.
७० वर्षांवरील पुरुष गटात हरेश रांधेरीया यांनी प्रथम, दत्तात्रय सोनवणे यांनी द्वितीय आणि चिंतामण वैती यांनी तृतीय क्रमांक पटकावला, तर महिला गटात लीला जोश प्रथम, अंजू कौशिक द्वितीय व भारती शहा तृतीय ठरल्या.
६० वर्षांवरील दुसऱ्या पुरुष गटात रमेश गुप्ता प्रथम, नरेंद्र निकम द्वितीय व हेमंत देशपांडे तृतीय आले, तर महिला गटात कस्तुरी लोटलीकर प्रथम, नीलिमा फ्रान्सिस द्वितीय व प्रमिला राय तृतीय ठरल्या.
५० वर्षांवरील पुरुष गटात मोहम्मद सिद्दिकी प्रथम, सिताराम शेट्टी द्वितीय व पराग रिजबुड तृतीय आले, तर महिला गटात सुमन राय प्रथम, चंदा गुप्ते द्वितीय व शैलजा सोमानी तृतीय ठरल्या.
४० वर्षांवरील पुरुष गटात मंगेश खरटमल प्रथम, राजेश परमार द्वितीय व अमय बोरकर तृतीय आले, तर महिला गटात दीपिका गावडे प्रथम, सुनयना कुंभार द्वितीय व नीता पवार तृतीय ठरल्या. सर्व विजेत्यांना पारितोषिके व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.
पारितोषिक वितरण व सत्कार समारंभास स्थानिक नगरसेविका रोहिणी कांबळे, एनकेजीएसबी बँकेच्या मॅनेजर जानवी पै, एमआयजी क्लबचे विशाल पाटणकर, संस्थेचे सचिव किरण भोगले, उपाध्यक्ष अंजली रिसोड तसेच स्पर्धा संयोजक अॅड. सी. डी. शेषाद्री यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ६.३० वाजता ज्येष्ठ नागरिक सल्लागार निळकंठ श्रीखंडे यांच्या प्रार्थनेने झाली. त्यानंतर पारितोषिक वितरणापूर्वी अरुणोदय धारावीचे सदस्य स्वर्गीय रमेश कावळे यांच्या निधनाबद्दल उपस्थितांनी उभे राहून सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली.
या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शिल्पा शिरोळे, शैलेश सोमानी, दिलीप गाडेकर, भारती पोळ, कुंदन तावरे, सुनंदा भोगले, शंकर बळी व किसन पारवे यांनी स्वयंसेवक म्हणून जबाबदारीने कार्य केले. स्पर्धांचे परीक्षण व नियोजन मुंबई उपनगर रेफ्री पंच मनोज आचार्य, महेश मुंडे, जिग्नेश पटेल व वैभव जाधव यांनी पाहिले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित नागरिक, विजयी स्पर्धक व सर्व सहकाऱ्यांचे आभार दिलीप गाडेकर यांनी मानले. कार्यक्रमानंतर सर्व सहभागी स्पर्धकांना खाऊ व भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. या उपक्रमासाठी एमआयजी टीम व अटलांटिक ग्रुप यांचे विशेष सहकार्य लाभले, तर रोटरी क्लब बीकेसी, भारत बँक, एमआयजी क्रिकेट क्लब व एनकेजीएसबी बँक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे

