क्रीडागुन्हे

कराटे ऍडव्हेंचर कॅम्पमध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग


चार दिवसांच्या प्रशिक्षण शिबिरात १३ जणांना ब्लॅक बेल्ट, ९ जणांना पहिला डन प्राप्त

डहाणू -(दिपक कायंदेकर)-युनाइटेड शोतोकान कराटे असोसिएशन इंडिया यांच्या वतीने डहाणू बोर्डी येथील सी. आर. फार्म्स येथे २५ ते २८ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत विंटर कराटे ऍडव्हेंचर कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते.

या कॅम्पमध्ये कराटे, सेल्फ डिफेन्स ट्रेनिंग, स्विमिंग, बीच योगा, बीच ट्रेनिंग, ग्रुप बिल्डिंग गेम, किकबॉक्सिंग, रायफल शूटिंग, कॅम्प फायर, कमांडो ट्रेनिंग, मर्दानी स्पोर्ट्स, वूशु आणि बॉक्सिंग यांसारख्या विविध शारीरिक व मानसिक प्रशिक्षण उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

या चार दिवसीय शिबिरात एकूण ११३ विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. त्यापैकी १३ विद्यार्थ्यांनी ब्लॅक बेल्ट परीक्षेत प्राविण्य मिळवले, तर ९ विद्यार्थ्यांना पहिल्या डनचा बेल्ट प्रदान करण्यात आला.

यामध्ये कुमार वेदांत कायंदेकर याने विशेष कामगिरी करत पहिला डन बेल्ट प्राप्त केला. वेदांत हा यादवराव तासगांवकर इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, कर्जत येथे कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत असून, तो एक योगा प्रशिक्षक म्हणूनही कार्यरत आहे.

या शिबिरात विद्यार्थ्यांना डॉ. मंदार पनवेलकर, स्मिता पनवेलकर, पियुष सदावर्ते, निलेश भोसले, प्रशांत गांगुर्डे, प्रतिक कारंडे, क्षमा कवली (गेस्ट), प्रवीण पाटील आणि अवंतिका पाटील यांनी प्रशिक्षण आणि परीक्षा मार्गदर्शन दिले होते.


निर्भय युवा

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *