राजकीय

राजेश गोरे यांची शिवसेना शाखा क्र. १५५ च्या कार्यालय प्रमुखपदी नियुक्ती


मुंबई-(संतोष शिंदे)शिवसेना शिंदे गटाच्या चेंबूर येथील शाखा क्रमांक १५५ च्या कार्यालय प्रमुखपदी राजेश गोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गोरे यांच्या नियुक्तीमुळे परिसरातील शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून संघटनात्मक कार्याला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

राजेश गोरे हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक व संघटनात्मक कार्यात सक्रिय असून, सामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने प्रयत्नशील राहिले आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत शिवसेनेच्या वरिष्ठ नेतृत्वाने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. कार्यालय प्रमुख म्हणून ते शाखेच्या कार्यात अधिक गतिमानता आणून पक्षवाढीसाठी योगदान देतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या नियुक्तीबद्दल गणेश चौक मित्र मंडळाच्या वतीने राजेश गोरे यांचे अभिनंदन करण्यात आले असून, त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. सामाजिक बांधिलकी, जनहिताचे प्रश्न आणि शिवसेनेची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी ते प्रभावी भूमिका बजावतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला आहे.


निर्भय युवा

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *