ताज्या घडामोडी

मनसेच्या धारावी विधानसभा उपविभाग अध्यक्षपदी नितीन पोपट दिवेकर नियुक्ती


 

मुंबई- प्रज्ञा प्रतिष्ठान संस्थेचे सरचिटणीस आणि धारावीतील तरुण तडफदार कार्यकर्ते नितीन पोपट दिवेकर यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या धारावी विधानसभा उपविभाग अध्यक्षपदी (प्रभाग क्र. १८३,१८४,१८५) नियुक्ती करण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आलेल्या नियुक्तीपत्राद्वारे ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.मनसे चे मुंबई उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले.

नितीन दिवेकर यांच्या या नियुक्तीमुळे धारावी परिसरातील मनसे कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून, सर्व स्तरांतून त्यांच्या नियुक्तीचे उत्साहपूर्वक स्वागत करण्यात येत आहे. तरुणाईमध्ये लोकप्रिय आणि संघटनात्मक बांधणीसाठी सदैव अग्रभागी असलेले दिवेकर हे मनसेच्या विचारधारेप्रती कटिबद्ध असून, पक्षाची ताकद वाढविण्यासाठी ते निर्णायक भूमिका बजावतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

 

 

 

 


निर्भय युवा

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *