बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या विशेष बैठकीत नव्या नियुक्त्या व पक्ष प्रवेश
स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी BRSP सज्ज
मुंबई-बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी (BRSP) महाराष्ट्र प्रदेशांतर्गत जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्ष यांची आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विशेष बैठक मराठी पत्रकार संघ, आझाद मैदान, मुंबई येथे मोठ्या उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडली.
या बैठकीदरम्यान पक्षात नव्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या तसेच मुंबई विभागात अनेक कार्यकर्त्यांनी BRSP मध्ये प्रवेश केला. ही संपूर्ण प्रक्रिया पक्षाचे संस्थापक अध्यक्ष ऍड. डॉ. सुरेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात पार पडली.
बैठकीस प्रदेश महासचिव इयाजभाई चायवाला, प्रदेश महासचिव अरविंद कांबळे, युवा आघाडी महाराष्ट्र अध्यक्ष पंकज चाळके, प्रदेश सचिव ॲड. माणिक आदमाने, प्रदेश सचिव ॲड. धीरज बगाडे, प्रदेश सचिव रामचंद्र कांबळे आणि मुंबई उपाध्यक्ष खलीलभाई शिरगावकर यांच्यासह राज्यभरातील विविध जिल्ह्यांतील जिल्हाध्यक्ष आणि तालुकाध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या विशेष बैठकीचे यशस्वी आयोजन मुंबई प्रदेशाध्यक्ष दिपक चौगुले यांनी केले. आगामी निवडणुकांमध्ये संघटनशक्ती वाढवून बहुजन समाजाला सक्षम पर्याय देण्यासाठी BRSP सज्ज असल्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला.

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे

