दादर फुल मार्केट परिसरातील अवैध फेरीवाल्यांवर पालिका आणि पोलिसांची धडक कारवाई
मुंबई-(शिवा नाडार)-बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या जी उत्तर वॉर्ड कार्यालयातर्फे दादर (प.) पोलिस ठाण्याचे वपोनि ज्ञानेश्वर आवारी यांच्या मार्गदर्शनाखाली आज दादर पश्चिम रेल्वे स्टेशनजवळील फुल मार्केट आणि कबुतरखाना परिसरात अवैध फेरीवाल्यांविरोधात धडक कारवाई करण्यात आली.
या कारवाईदरम्यान अवैध फेरीवाल्यांवर निष्कासनाची कार्यवाही करून संपूर्ण परिसर मोकळा करण्यात आला. त्यामुळे रेल्वे स्थानकातून प्रवास करणारे नागरिक तसेच या मार्गावरून ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
ही मोहीम राबविताना पालिकेच्या अतिक्रमण व निष्कासन विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच दादर पोलिस ठाण्याचे सपोनि अमोल केसकर, पोलीस उपनिरीक्षक आशिफ मणुरे, पोलीस उपनिरीक्षक चव्हाण आणि अंमलदार उपस्थित होते.
पालिकेची ही कारवाई नियमितपणे सुरू राहिल्यास परिसरातील अव्यवस्था आणि पादचारी अडथळे मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे

